Slide 1
Excellent Education Program
Innovative Methods of Teaching

Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit. Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient.

Slide 2
Learning Through Play
Devoted to the Early Education

Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla consequat massa quis enim.

Slide 3
Learning Through Play
Find a Class for your Children

Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim. Aliquam lorem ante, dapibus in, viverra quis.

previous arrow
next arrow

व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

"आज मी जो काही सकारात्मकरित्या घडलो आहे, ती सारी आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीची देण आहे."

या वाक्यातच डॉ. प्रविण मोरे यांच्या भूमिकेचा,समाजहिताच्या भावनेचा, मगासवर्गीय तरुणांच्या शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय दूरदृष्टिकोणाचा सकारात्मक असा हेतु स्पष्ट होतो.
सातारा जिल्ह्यातल्या नुने या एका छोट्याश्या गावात जन्मलेला आणि सर्वसाधारण परिस्थितिशी झुंज देत,शिक्षणाच्या जोरावर स्वतःला आंबेडकरी चळवळीत झोकुन देत कार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच, डॉ.प्रविण विट्ठल मोरे सर.
बाबासाहेब कायम म्हणायचे की,आपल्या ज्ञानाचा उपयोग ईतर लोकांना व्हावा आणि त्यासाठी सुशिक्षित वर्गाने कर्तव्यनिष्ठ राहून पुढाकार घ्यावा.प्रविण मोरे सर अगदी याच विचारांवर आपली वाटचाल करतांना दिसतात. त्यांच्या आयुष्यातील शैक्षणिक,सामाजिक,राजकीय प्रवास जाणून घेतल्यास प्रत्येक तरुणांच्या मन-मेंदूत एक ऊर्जा निर्माण होते.
अभ्यासू वृत्ती,समाजापरी विचारकेंद्रित भूमिका आणि त्या भूमिकेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी आजवर केलेले सकारात्मक कृतीकार्यक्रम,संशोधन हे अत्यंत महत्वाचे आहे.

तेजस्वी सूर्य

Click edit to change this text. Lorem ipsum dolor sit amet, cctetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

जाणता लोकनेता

Click edit to change this text. Lorem ipsum dolor sit amet, cctetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

अष्टपैलू व्यक्तिमत्व

Click edit to change this text. Lorem ipsum dolor sit amet, cctetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

चळवळ

चळवळ

२ जून १९७६ साली सातारा जिल्ह्यातील नुने गावात डॉ.प्रविण मोरे सर यांचा जन्म झाला.प्रार्थमिक,माध्यमिक शिक्षणानंतर पूढचे शिक्षण सातारा जिल्ह्यात झाले.पूढे ते सामाजिक कार्य अभ्यासात पदवीधर झाले.विद्यार्थी दशेत असतांना त्यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक अभ्यासू मान्यवरांची व्याख्याणे प्रत्यक्ष ऐकली.
पद्मश्री लक्ष्मण माने,आ.हं साळूंखे,
नरेंद्र दाभोळकर,पार्थ पोळके,राजा ढाले अश्या अनेक दिग्गज विचारवंत,क्रांतीकारी कार्यकर्ते अभ्यासू लेखक,यांच्या व्याख्यानांचा परिणाम डॉक्टरांच्या विद्यार्थी आयुष्यावर सकारात्मकरित्या झालेला आहे.

जेंव्हा ते साताऱ्याहुन मुंबईत आले त्यावेळी त्यांना बऱ्याच मित्रांनी योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले होते.त्याच भावनेने पूढे त्यांनी टाटा इंस्टिट्यूट आणि निर्मला निकेतन या ठिकाणी शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने “बहुजन स्टुडंट्स नेटवर्क” नावाची संस्था स्थापन केली.

ग्रामीण भागातून आलेल्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध पद्धतीने मुलाखती कशा द्याव्या,अर्ज कसे करावे? शैक्षणिक संधी कोणती आहे स्कॉलरशिप कोणते आहे फॉरेन स्कॉलरशिप कोणती आहे हि सगळी माहिती मिळण्यासाठी अनेक विद्यार्थ्याना या ‘बहुजन स्टुडंट्स नेटवर्कचा” उपयोग झाला.शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या विद्यार्थ्यांसाठी छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळवून देण्यात सुद्धा पुढाकार घेतला.

ज्या जागेवर हे प्रशिक्षण केंद्र सुरु होते ते भाडेतत्वावर होते ज्याचे दरमहा भाडे प्रविण मोरे स्वतःच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून देऊ करत.पूढे २००९ साली,त्यांनी तळोजा येथे एक घर घेऊन ते सुद्धा विद्यार्थी वर्गाच्या कामी यावं यासाठी वापरले आणि आज सुद्धा त्याच कार्यासाठी वापरले जाते.या टिमवर्कचा विद्यार्थ्यांना फार उपयोग झाला.आजही होतो आहे.


एखाद्यावर लहानपणापासूनच आंबेडकरी चळवळीचे संस्कार असले कि तो व्यक्ती सामाजिक सुधारणांच्या उपक्रमात पुढाकार घेण्याची ईच्छा ठेवतो हे बहुतांशवेळी घडते. आणि ती ईच्छा एखाद्याला विद्याव्यासंगी होण्यास भर पाडणारी ठरते.असेच काहीसे डॉ. प्रविण मोरे यांच्या बाबतीत आहे.
२००२ पर्यंत प्रविण मोरे यांचे उच्च शिक्षण पूर्ण होऊन एम.एस.डब्लू झाल्यानंतर ते सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाले.त्यांनी अनेक समवैचारिक तरुणांसोबत सामाजिक सुधारणेला पूरक असे कृतिकार्यक्रम राबवले अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला.

नॅशनल दलित ह्यूमन राईट्स, एस.एन.सी.डी. एच.आर अश्या संघटनेत सक्रिय सहभाग घेतला. बजेट अँनालिसिस करणे,शिक्षणाच्या बाबतीत योजनांचे अध्ययन करणे अश्या महत्वपूर्ण कार्यात त्यांचे फार योगदान आहे.

ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत असणारी “विकास सहयोग प्रतिष्ठान संस्था” या माध्यमातुन केलेल्या कामांचा अनुभव त्यांना फार महत्वाचा वाटतो.

त्यांचे सामाजिक क्षेत्रात सर्वात महत्वाचे काम कोणते असावे तर अत्याचाराच्या घटनेचा अभ्यास करणे.त्याचे फैक्टफाइंडिंग करून तथ्य शोधणे.रिपोर्ट्स तयार करणे असो, पोलिस स्टेशन पासून ते मंत्रालय पर्यंत,जिल्हास्तर असोत वा कोर्ट केसचा पाठपुरावा असोत अश्या तब्बल ७५ ॲट्रॉसिटीच्या केसेस त्यांनी हाताळलेल्या आहेत.या केसेस मधून ४० केसेसवर त्यांना चांगले काम करता आले आणि दोन केसेस मध्ये आरोपींना शिक्षा मिळालेली आहे.

त्यानंतर माजलगाव येथील महादेव साळवे खून खटल्याचा विषय असोत किंवा या सारख्या अनेक अत्यंत गंभीर अश्या घटनेवर त्यांनी महत्वाचे काम केले आले.

अनुसूचित जातीसाठी असणारं सरकारी बजेटचे अध्ययन करणे बजेट अनालिसिस करून आकडेवारी मध्ये त्याचे विश्लेषण करणे. मूलभूत योजनांवर मागे झालेला खर्च किंवा त्या योजनात असलेल्या त्रुटी आणि अखर्चित निधी यावर मुद्देसुद मांडणी करून सरकारी पटलावर ती पोहोचवण्याचे काम अतीमहत्वाचे वाटते.

अनुसूचित जाती जमातीसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सबलीकरणाच्या योजना,शिष्यवृत्ती मंडळं त्यांचा बजेट,या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून त्याबाबत असलेले प्रश्न त्यातील त्रुटि त्या योजना आणि मंडळांचा उपयोग झालाय किंवा नाही अश्या सर्वबाबी शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते करत असतात.लोकांपर्यंत याबाबतची सर्व माहिती पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण शिबिर सुद्धा आयोजित करत असतात.

अनेक ज्या संस्था संघटना आहेत त्यांच्या क्षमता बांधणीचं काम करणे त्यांना लोकांच्या पर्यंत उपक्रम मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे.

तरुणांच्या शैक्षणिक,आर्थिक सुधारणेसाठी कायम सक्रिय असणारे प्रविण मोरे सर खऱ्या अर्थाने सामाजिक सुधारणा करू पाहतात हे त्यांच्या वरील वाटचालीवरुन लक्षात येते.

मुद्रा मोरे साहेबांची

मुद्रा मोरे साहेबांची

Scroll to Top